यापुढे अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर… ; उदयनराजे भोसले संतापले

यापुढे अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर… ; उदयनराजे भोसले संतापले

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राजाचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट दिसून आली. त्यावर आता उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

उदयनराजे भोसले यांनी भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली. पुढील भूमिका त्यांनी २८ नोव्हेंबर रोजी स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. यापुढे शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास नेस्तनाबूत करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. उदयनराजे पुढे म्हणाले की, विकृती ही विकृती असते, त्याला जात, पात, धर्म नसतो. उदयनराजे यांनी राज्यपाल विचार जुना झाल्याचे म्हणत असताना व्यासपीठावर असलेल्यांनी आक्षेप का घेतला नाही? शिवरायांचा अपमान होत असताना गप्प का बसता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

अनेक देशात योद्धे होऊन गेले पण त्यांनी आपल्या लढाया आपल्या साम्राज्यासाठी केल्या, पण शिवरायांनी गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी लढाया केल्या. आधुनिक भारताची संकल्पना त्यांनी त्यावेळीच मांडली. शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान आहेत. आजपर्यंत कोणाचा आदर्श घेऊन वाटचाल झाली? त्रिवेदी म्हणाला माफी मागितली, याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? यांना लाज वाटत नाही का? हे सर्व वेदनादायी असून अशा वक्तव्यांनी चीड येते. शिवरायांनी सर्वधर्मसमभावाची मांडणी त्यांनी केली. धर्मस्थळांचा त्यांनी सन्मान केल्याचे उदयनराजे म्हणाले.

राज्यात आल्यापासून वादाची माळ लावून सोडलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असेही कोश्यारी म्हणाले.

हे ही वाचा : 

उत्कंठावर्धक ‘वेड’ लावणारा चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

Dada Bhuse : … हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही : दादा भुसे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version