spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सन्मानासाठी बुरखा वाटप केले तर मग त्यात वावगं वाटण्यासारखं काय? Yamini Jadhav यांचा विरोधकांना सवाल

शिंदे गटाविरुद्ध ठाकरे गट असा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सध्या पहायला मिळत असताना आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या पक्षाच्या बॅनरखाली एक कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यामिनी जाधव यांनी केलेल्या या क्रियेमुळे आता विरोधकांना टीका करण्याची संधी लाभली आहे. यामिनी जाधव यांनी मुस्लिम समाजातील महिलांना बुरख्याचे वाटप केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.

सकाळ-संध्याकाळ हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आता मुस्लिम समाजाची गरज वाटू लागली आहे का? असा सवाल विचारत सुषमा अंधारे म्हणाल्या की, विकासाचे मुद्दे नसल्याने मतांवर डोळा ठेवून प्रत्येक योजना तसेच कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. एकीकडे पदोपदी मुस्लिम द्वेष पसरवण्याचे काम करायचे आणि दुसरीकडे मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप करण्याचे ढोंग करायचे, अशी दुटप्पी भूमिका शिंदे गटाची आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर यामिनी जाधव यांनी भाष्य केले आहे. यामिनी जाधव म्हणाल्या की, मी गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम धर्मासाठी काम करत आहे. मुस्लिम धर्मातील महिलांना सर्वात जास्त काय प्रिय असेल तर तो बुरखा आहे. हा त्यांचा एक सन्मान आहे. त्या दृष्टीने मी हे वाटप केलं आहे. माझ्या विधानसभेच्या मतदार संघात सर्व धर्माचे लोक राहतात. लोकप्रतिनिधीने त्यांच्या विभागातील लोकांना काय हवं आहे ते कुठल्या धर्माचे का असेना त्यांचा पहिला विचार करणे गरजेचे असते. लोकप्रतिनिधीने बाहेर सतत वावरताना स्वतःचा धर्म सतत पुढे न करता माझ्या लोकांना काय हवं आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. या विभागाचे नेतृत्व गेल्या 25 ते 30 वर्षांपासून यशवंत जाधव करत आहेत. दिवाळीच्या वेळी आपण घराघरात एखादी भेट वस्तू देत असतो पण मुस्लिम भगिनींना पण काहीही देत नाही. म्हणूनच, मी बुरख्याचे वाटप केल्याचे यामिनी जाधव यांनी म्हटले आहे. आज आम्ही मुस्लिम महिलांचा सन्मानासाठी बुरखा वाटप केले तर मग त्यात वावगं वाटण्यासारखं काय आहे? असा सवाल यामिनी जाधव यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

Malaika Arora Father Death: मलायकाच्या वडिलांचे नाव नेमके काय? दोघांच्या वयातील अंतर पाहून व्हाल चकित…

Ganeshotsav 2024: गौरी विसर्जन कोणत्या कालावधीत करायचे आणि कोणते नियम पाळायचे आहेत ते जाणून घेऊयात सविस्तर…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss