Thursday, July 4, 2024

Latest Posts

संधी मिळाली तर शेतकरी कुटुंबातील तरूण…Nilesh Lanke च्या शपथविधीवर Jitendra Awhad काय म्हणाले?

२४ जून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसद भवन येथे शपथ घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत यशस्वी झालेल्या खासदारांनी शपथ घेतली. आज २५ जून रोजी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde), शिरूर मतदारसंघाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe), बारामतीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule), चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar), भिवंडी मतदारसंघाचे सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre), सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), अमरावतीचे बळवंत वानखेडे (Balwant Wankhede), तसेच अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शपथ घेतली. यासर्वांमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरले ते म्हणजे, निलेश लंके. इतर नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ ग्रहण केली. मात्र, निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. महाराष्ट्रातील खासदार असूनही इंग्रजीत शपथ घेतली, यापेक्षा त्यांनी निवडणुकीत त्यांच्या विरोधात असलेल्या सुजय विखे-पाटील यांना चपराक देण्यासाठी इंग्रजीत शपथ घेतल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून आव्हान दिले होते. तेच आव्हान आता निलेश लंके यांनी पूर्ण करून दाखवले आहे. त्यानंतर आता त्यांनी घेतलेल्या शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी निलेश लंके यांचे कौतुक केले आहे. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कौतुक करतांना जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत संधी मिळाली तर आजची तरुणाई व्यवस्था बदलू शकते, असे म्हटले आहे. 

काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट? 

ज्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवले होते. त्यांनी या देशाचे संविधान लिहिले. संधी मिळाली तर गोरगरीब, दलित, शेतकरी कुटुंबातील तरूण व्यवस्था बदलू शकतो. ज्यांना इंग्रजी येत नाही, असे म्हणत हीनवले होते. त्या खा. निलेश लंकेंनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात चक्क इंग्रजीत शपथ घेऊन चपराक लगावलेय! असे भाष्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

हे ही वाचा

Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss