गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे; सुषमा अंधारे

गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे; सुषमा अंधारे

शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात आल्या असून ते तीन महिन्यांचे बाळ असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. त्यावर मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला. महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर ये डर मुझे अच्छा लगा, अशी टीकाही त्यांनी केली.

महाप्रबोधन यात्रेतील दुसर्‍या टप्प्यासाठी उपनेत्या अंधारे या मंगळवारी जिल्ह्यात आल्या. याअनुषंगाने जळगावात प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या की, मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले काही लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली असे आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही. पाचोर्‍यात आदित्य ठाकरेंची सभा जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते.

विरोधकांची सुरक्षा काढली आणि बंडखोरांना वाढविण्यात आलेल्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या की, बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत. लोकांना माहिती आहे, सत्ताधार्‍यांना सुरक्षेची गरज आहे. सत्ताधार्‍यांनी सत्ता ही अत्यंत कुटीलपणे, कुटनीतीने आणि कपटकारस्थानाने मिळविलेली आहे आणि ही कपटकारस्थाने जनतेला आवडलेली नाहीत. त्यामुळे जनता अत्यंत संतप्त आहे. या संतप्त जनतेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांना काही करू नये, म्हणून घाबरलेल्या सरकारने ही सुरक्षा वाढवून घेतली आहे. कारण, यामुळे त्यांना लोकांचे पाठबळ नाही, असा घणाघातही अंधारे यांनी केला.

हे ही वाचा :

Kishori Pednekar : ‘कर नाही त्याला डर कशाला’, अडीच तासाच्या पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

टाटा सन्सच्या अध्यक्षांचे गडकरींना पत्र; टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version