संधी मिळाली तर बिग बॉसमध्येही जाऊ- मंत्री गुलाबराव पाटील

संधी मिळाली तर बिग बॉसमध्येही जाऊ- मंत्री गुलाबराव पाटील

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बिग बॉसमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःहून यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय, असे सांगत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आम्हाला बोलावलं तर निश्चितपणे जाऊ. मला असं वाटतं की गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये कोणी बोलवत असेल आणि अशी संधी जर मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण मला होतेय, असे सांगत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा ही भाग घ्यायचो. असे सांगत आणि आता बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मराठी बिग बॉस होस्ट करणारे महेश मांजरेकर यांना नुकताच प्रश्न विचारण्यात आला होना की, राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉसमध्ये तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर महेश मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव घेतलं होतं.

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. कलाकार किंवा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा वादग्रस्त व्यक्तिमत्त्व हे बिग बॉस या शोमधील स्पर्धक असतात. हे स्पर्धक जवळपास तीन महिने एकाच घरात एकत्र राहतात आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नसतो. भारतात बिग बॉस विविध भाषांमध्ये प्रसारित होतो. उद्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून हिंदी बिग बॉसला सुरुवात होत आहे. तर मराठी बिग बॉस २ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

हे ही वाचा:

दिग्विजय सिंहनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात अजून एका नेत्याची एन्ट्री!

Amazon,Flipkart Sale चा आज शेवटचा दिवस, जमलं तर लुटून घ्या, पुन्हा मिळणार नाही अशी संधी

Follow Us

Exit mobile version