महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर प्रगतीची ‘काशी’ होईलमी, उदयनराजे भोसले

महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर प्रगतीची ‘काशी’ होईलमी, उदयनराजे भोसले

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सातारा – महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांकडून हे करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगलप्रभात लोढा या भाजपशी निगडीत नेत्यांकडून महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरून भाजपचे खासदार छत्रपती छत्रपती उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी आज साताऱ्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकशाहीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले, घराणेशाहीमुळे विकेंद्रीकरण लांबच राहिले, फक्त भाषणात विकेंद्रीकरण असतं. बाकी सगळीकडे केंद्रीकरण आहे. जर हे केंद्रीकरण असेच सुरू राहिलं, तर देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराज नसते, तर लोकशाहीचे तुकडे व्हायला किती वेळ लागला असते. सर्वधर्मसमभावाची राज्यकर्त्यांनी व्याख्या बदलून टाकली, हे घातक आहे. जेव्हा तुकडे होतील तेव्हा प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागेल. जशी देशाची वाताहत होईल तशी आपल्या कुटुंबाची देखील वाताहत होणार असल्याचे उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले.

उदयनराजे (Udayanraje Bhosale) पुढे म्हणाले, शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा विचार जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवला पाहिजे. ही आताची गरज आहे. थोर पुरुषांचे विचार फक्त एका दिवशी न घेता कायम घेतले पाहिजेत. देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे. त्यांचा विचार हणून पाडू, आज जगात सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. त्यांचा विचार घेऊन अनेक चळवळी उभा राहिल्या. देशाची प्रगती म्हणजे काय? प्रत्येकाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. राज्याची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर प्रगतीची ‘काशी’ होईल.

हे ही वाचा : 

श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणात मोठी उपडेट, सापडलेली हाडे वडिलांच्या डीएनएशी जुळली

सीमावादावर गृहमंत्री अमित शाह काय करणार?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version