Wednesday, October 2, 2024

Latest Posts

नेत्यांनाच खुश करायचं असेल तर बंद खोलीत… – रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पढली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांन मध्ये आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे. राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. जर नेत्यांनाच खुश करायचं असेल तर अशा मोठ्या ठिकाणी नाही तर बंद खोलीत देखील त्यांना खुश करु शकतो, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आई-वडिलांना शिव्या देऊ हे पुढच्या पिढीसाठी घातक आहे. हा सगळा विषय संस्कृतीचा देखील आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यांने तोंडावर ताबा ठेवला पाहिजे, असा सल्ला देखील रोहित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते.

आई-बापाला शिव्या द्या मात्र मोदी शहांना शिव्या देऊ नका, असं वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं, त्यानंतर अनेकांनी यावरुन त्यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार यांनी यावेळी सांगितले की, मागील महिन्यात ऋतुजा लटकेंनी राजीनामा दिला होता. त्या प्रकरणाला तीस दिवस उलटून गेल्याने त्यांनी परत राजीनामा दिला. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर केला जात नाही आहे. या मागे कदाचित राजकारण असावं, कोर्ट काय निर्णय देतो यावर सगळी गणितं ठरतील. व्यक्तीवर झालेल्या अन्यायावर संजय राऊतांनी पत्रात लिहिलं आहे. त्यांच्या आईला उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलंय मात्र काहीही असलं तरीही संघर्ष करणं गरजेचं आहे. संघर्ष करताना लोकांना विश्वासात घेऊन, मोठी ताकद लावून लढावं लागेल, असंही त्यांनी पत्रात लिहिलं आहे. त्यात सोनिया गांधींचा ही उल्लेख केला आहे. मात्र युवा पिढीच्या मदतीने आम्ही संघर्ष करु आणि ज्या गोष्टी खटकतील त्यांवर प्रश्न विचारु, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून फी वाढीच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. चारशे टक्के फी वाढ अन्यायकारक आहे. ती कमी झालीच पाहिजे. या विद्यापीठात शेतकऱ्यांची आणि सामान्यांची मुलं शिक्षण घेत आहे. त्यांना योग्य शिक्षण द्याव त्यासोबत फी वाढ कमी करावी, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा :

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात, लवकरच करणार तारीख जाहीर

Andheri East By poll 2022 : ऋतुजा लटकेंना दिलासा; कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss