विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल; रोहित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल; रोहित पवार

सध्या राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री आहेत असे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून बॅनर लावले जात आहे. त्यात आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल, असं वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. अजितदादांकडे असलेल्या अनुभवामुळं राज्यातील नागरीकांना योग्य वेळी निर्णय घेतल्याचा फायदा होईल असेही रोहित पावर यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आयोध्या दौऱ्यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोध्या दौरा करावा मात्र, त्यावरून राजकारण करु नये असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं.

“एखादी ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल, ज्याचा प्रशासनावर वचक असेल आणि त्यांची काम करण्याची पद्धत लोकांना माहीत असेल. तेव्हा प्रशासनाचीही निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. निर्णय लवकर घेतले तर लोकांनाही याचा फायदा होत असतो”. सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी असे रोहित पवार म्हणाले. मागच्या वेळी राज्यात ११० टक्के पाऊस झाला तेव्हा विरोधक ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागमी करत होते. आता १२६ टक्के पाऊस झाला असूनही ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.

भाजप आमदार आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट ट्विट केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. नोटांवर कुणाचा फोटो असावा यापेक्षा ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना ओला दुष्काळ जाहीर करुन मदत मिळावी हा विषय महत्वाचा असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. सध्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी रोहित पवारांनी त्यांचेही स्वागत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांनी दिवाळी निमित्ताने जनतेशी संवाद साधला ठीक आहे, पण सरकारने जो आनंदाचा शिधा वाटला तो कुणापर्यंत पोहोचला नाही हे पाहावं लागेल. सोबतच आज शेतकऱ्यांना हातामध्ये मदत पाहिजे आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे व्हावेत, त्याकडं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असंही रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंच्या आधी कृषी मंत्री पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या भेटीला

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version