spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जर राज ठाकरे जनतेच्या मनात मुख्यमंत्री आहेत तर मग मी जनतेच्या मनात भारताचा पंतप्रधान, जितेंद्र आव्हाड

मनसेचा आज शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मोठा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरु केली आहे. या मोर्चाला हजारो लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मनसेचा आज शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मोठा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरु केली आहे. या मोर्चाला हजारो लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मोर्चाचे वातावरण निर्मिती म्हणून शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनर्स आणि मोठ मोठे कटआऊट्सही लावले आहेत. यामध्ये काही कटआऊट्सवर तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… राज ठाकरे, असं लिहिलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर राज ठाकरे (Raj Thackeray) हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे जितेंद्र आव्हाड माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं जर त्यांना वाटत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मला सुद्धा वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अयोध्येला जात असतील तर चांगलं आहे त्यांनी अयोध्येला गेलं पाहिजे. कारण त्यांना आता रामाचं वाचवेल त्यामुळेच ते जात असतील तर त्यांचं स्वागत आहेच असा चिमटाही त्यांनी काढला आहे. अगोदर महेश आहेर यांना मूळ अधिकार पदावर आणा त्यांना उपकार्यालयीन अधीक्षक करा त्यानंतर आपण बाकीचे सगळे बोलूया. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेवढे तरी करावं. पैशाने हात बरबटल्यामुळे महापालिकेचे खालचे अधिकारी काहीच करायला तयार नाहीत. महेश आहेर यांचा पदभार काढला नाही. त्यांना तात्पुरता पदभार दिला याच मला दुःख वाटत आहे. त्यांना ५ वर्ष त्याच पदावर ठेवले गेले. त्यावर आयुक्तांचे लक्ष नव्हते आता तो वरिष्ठांकडे बिट दाखवून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले.

महेश आहेर यांच्याकडे सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार सोपवला गेला. मूळत: ते आहेत उपकार्यालयीन अधीक्षक. प्रशासनातील कोणत्याही महाभागाने ही फाईल फुटअप केली की, उप कार्यालयीन अधिक्षक हा थेट सहाय्यक आयुक्ताचा कार्यभार सांभाळतो आणि तो देखील ५ वर्ष. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर हे तरुण आहेत अन माझ्या माहितीप्रमाणे सर्व्हिस ल्स चे पुस्तक त्यांनी वाचले असेल. कोणत्याही सर्व्हिस रुल्सच्या कायद्यामध्ये बसतं की, आपण एखाद्याला तात्पुरता पदभार किती वर्ष देऊ शकतो? याबाबत आखि नियम आहेत की, सगळेच नियम ठाणे महानगरपालिकेने धाब्यावर बसवले आहे असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल, अजित पवार

ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करा, शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची आयुक्तांकडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss