spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुषमा अंधारे निष्ठा शिकवत असतील तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही ; शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई

दसरा मेळावा झाल्या नंतर दोन दिवस उलटले आहे. तरी, नेत्यानं मध्ये अजून टीका टिपणी सुसरच आहे. दसऱ्या मेळाव्यामध्ये दोन्ही गटाकडून जोरदार भाषण पहिला मिळालं. शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी शिवाजी पार्क वर जोरदार भाषण केलं. सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातून अनेक शिंदे गटात गेलेल्या नेत्यानं वर हल्लबोल केला. अंधारेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अंधारेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे या एक महिन्यापूर्वी शिवसेनेत आल्या आणि उपनेत्या झाल्या. आता त्या आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणीही राहिलेलं नाही. त्यामुळं आता जो पक्षात येईल, त्याला पद मिळत आहे, जो येईल त्याला थेट मातोश्रीवर प्रवेश मिळतो आहे, असं प्रत्युत्तर देसाईंनी दिलं. सुषमा अंधारेंनी वाटेल तसा प्रचार करावा. मात्र, लोकांना जो योग्य वाटेल त्यांनाचा पाठिंबा मिळेल, असा घणाघातही त्यांनी अंधारेंवर केला. दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. शिंदे गटातील नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. या टीकेला शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय.

शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या अटके नंतर शिवाजी पार्क वर कोणत्या नेत्याचं भाषण जोरदार होईल हा प्रश्न सर्वांचं पडला होता, पण शिवसेनेनी आपल्या पिटार्यातून नवीन पॉवर ब्रँड नेते सुषमा अंधारे यांना बाहेर काढले आहे. दसऱ्या मेळाव्यात सुषमा आहरे यांनी त्यांच्या व्रक्तुत्व शेळी मुळे अनेक शिवसैनिकांची मने जिंकली आहेत.

हे ही वाचा:

Bigg Boss 16: हिंदी बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार राडा, एमसी स्टॅनची शिव ठाकरेबाबत पर्सनल कमेंट

मोठी बातमी! पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss