spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बाहुलं बनणार असेल तर देशातील संविधान धोक्यातच आहे” – Sanjay Raut

राज्यात विधानसभेच्या दृष्टीने अनेक नवनव्या गोष्टी सुरु झाल्या आहेत. त्यामुले प्रत्येक पक्ष आपली पोळी भाजून घेण्याच्या फिर्यादीत आहेत. यामुळे अनेक नवनवे खुलासे केले जात आहेत. असाच एक खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडावे लागले. त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती. तसेच उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न होते असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी लोक आहेत. लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर एकनाथ शिंदे खोटच बोलणार आहेत. एकनाथ शिंदे शिंदे हे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी लोक आहेत. हे आता त्यांच्या कळपात शिरले आहेत. लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार? एकनाथ शिंदे खोटच बोलत आहेत. राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे आमच्या सोबतच होते. तेव्हा ठाण्याच्या पुढे त्यांची काही मजल नव्हती. २५ वर्षा आधीच्या राजकरण्यात त्यांचा काही सहभाग नव्हता.

विधानसभा निवडणूक लांबणीवर पाडणे ही सरकार साठीची सोय :

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, संजय राऊत म्हणाले की, “निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे. पण ती राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बाहुलं बनणार असेल तर देशातील संविधान धोक्यात आहे. न्यायालय, निवडणूक आयोग या संस्था जर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान कुठे राहिले? या देशात महाराष्ट्रातल्या निवडणुका जर डिसेंबर महिन्यात होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते त्यांनी हा डाव टाकला आहे. झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका हरियाणासोबत व्हायला हरकत नव्हती. पण, झारखंडची निवडणूक यासाठी पुढे ढकलली की, त्यांना हेमंत सोरेन यांना हटवायचे आहे. त्यासाठी ते झारखंडची निवडणूक ते घेत नाही आणि महाराष्ट्रातही अशाच राजकीय कारणासाठी निवडणूक घेत नाहीत. महाराष्ट्रात जर निवडणुका घ्यायला निवडणूक आयोग आणि सरकार तयार नसेल याचा अर्थ ही हुकूमशाही सुरू आहे. कुठे आहे राज्यघटना? कुठे आहे संविधान? याचे उत्तर कोणी देणार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

  हे ही वाचा:

Shivsena UBT गटाचे ‘मुंबई मिशन’ होणार सुरु; ‘या’ १८ आमदारांना निवडणूक मतदारसंघाची दिली जबाबदारी

मित्रपक्षांमध्ये जुंपणार रस्सीखेच; Andheri East Assembly मतदारसंघात होणार दोन वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss