spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मला जर राऊतांनी भेट मागितली तर मी देईन; देवेंद्र फडणवीस

पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे बुधवारी जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांकडून फडणवीसांना राऊत यांनी केलेल्या त्यांच्या कौतुकाविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा फडणवीस यांनी म्हटले की, मी संजय राऊत हे काय बोलले, ते ऐकलं नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत म्हणाले, राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, मी सर्वांची भेट घेणार आहे. दोन तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत, त्यामुळे त्यांना भेटणार, असं राऊत म्हणाले. तसेच राजकीय कटुता संपवण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून स्वागत करण्यात आलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, संजय राऊतांनी भेट मागितली तर त्यांना नक्की भेटणार, राजकारणातील कटूता दूर करण्यासाठी सर्वांना मिळून ठरवावं लागेल, कुठलाही एक पक्ष हे ठरवू शकत नाही, आणि नेत्यांनी शांत राहायचं, इतरांना बोलायला लावायचं ही पद्धत बंद करायला हवी असे सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासंदर्भात मुख्य निवडणूक (Chief Election Commissioner) आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) मोठे वक्तव्य केले. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election) साठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तयार आहे. यावर फडणवीस म्हणाले, संपूर्ण देशात वन नेशन, वन इलेक्शन असे झालेच पाहिजे. देशात जेव्हा प्रत्येक राज्याची निवडणूक होते, या ऐवजी सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्या, तर त्या राज्याचा खर्चही वाचेल, मतदारांना देखील सोयीचे पडेल. राजकीय पक्षांना देखील एक भूमिका घेऊन समोर जावे लागेल.

हे ही वाचा :

IND vs ENG: नाणेफेक जिंकून इंग्लंडने घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Uddhav Thackeray and Sanjay Raut Live : राऊतांच्या धाडसाचे कौतुक करत, केंद्रीय यंत्रणायाना पाळीव प्राणी म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss