spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ मात्र… – दीपक केसरकर

मातोश्रीवर पुन्हा बोलावलं तर जाणार का असा सवाल केला असता दीपक केसकरकरांनी यावर आपलं मतं मांडलं आहे.

एकनाथ शिंदे ४० आमदारांसह सेनेतून बाजूला झाल्याने प्रतिदिन दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी तुम्हाला मातोश्रीवर पुन्हा बोलावलं तर जाणार का असा सवाल केला असता दीपक केसकरकरांनी यावर आपलं मतं मांडलं आहे. मातोश्रीवर सन्मानानं बोलावलं तर नक्की परत जाऊ पण त्यांना ही भाजपसोबत बोलणी करावी लागेल असं केसरकर म्हणाले.
संजय राठोड यांनीही मातोश्रीवर सन्मानाने बोलावल्यास, आम्हाला आशीर्वाद दिला तर आम्ही परत येऊ असं ही केसरकरांनी सांगितलं. दरम्यान शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी याआधीही आपण समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केल्याची आठवण करुन दिली. पुढे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, इतके दिवस जे गप्प होते ते आज तिथे जाऊन बोलत आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. हे सर्व करण्याची काही गरज नव्हती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“ज्यांनी ही सगळी विकृत भाषा वापरली, अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला. माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते. अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसत आहात? मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला ही कळू द्या. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss