spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आम्ही पुढे होऊन सत्तास्थापन केली नसती तर… – गुलाबराव पाटील

काही दिवसांपूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला त्यानंतर महाराष्ट्रमधलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनमध्ये मोठा वाद सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आज शिंदे फडणवीस सरकार मधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपसोबत (BJP) गेली असती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही गुलबाराव पाटील यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातली राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. ‘शिवसेना’ या पक्षावर शिंदे गटाने हक्क सांगायला सुरुवात केलीय. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे. येत्या काही दिवसांमध्ये ‘खरी शिवसेना’ कुणाची हे स्पष्ट होईलच. परंतु ठाकरे आणि शिंदे गटातील नेते कायम एकमेकांवर खालच्या स्तरावर टीकस्र करतांना दिसून येत आहेत. राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट केले आहे. ते म्हणाले की, ”आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत शपथ घेतली असती. नाहीतरी यापूर्वीदेखील पहाटेचा शपथविधी झालेलाच आहे. असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीला चिमटे काढले आहेत.

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटले आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच हा प्रयोग झाला असल्याचे पाटील म्हणाले. शिंदे सरकारनं जर हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती, असेही गुलबाराव पाटील म्हणाले. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, पक्ष सोडणे गैर नाही. परंतू, ज्या घरात वाढले ज्या घराने ओळख दिली त्यांच्यासोबत गद्दारी करणं चुकीचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे. आम्ही मूळ शिवसेनेत आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का? आम्ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

हे ही वाचा :

सत्तेचा गैरवापर सुरू असून माझ्या विरोधात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय – सुषमा अंधारे

Coronavirus in India : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे थैमान, तर मुंबईत XBB व्हेरियंटचा शिरकाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss