दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को…. ; पुण्यात मनसेचा एल्गार

दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को…. ; पुण्यात मनसेचा एल्गार

शुक्रवारी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सकाळ पासूनच संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून येत आहे. सकाळी पुण्यात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले, तर आता मनसेकडून सुद्धा निषेद करण्यात येत आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेला आता मनसेकडून ‘हर हर महादेव’ अशा घोषणेने उत्तर देण्यात येत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन चालू आहे.

शिवसेनेनंतर आता मनसे सुद्धा पुण्यात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांना देशभरातून अटक केल्यानंतर पुण्यामध्ये पीएफआयच्या काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली असे बोले जात आहे. त्यानंतर ‘दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ या घोषणा देत मनसेकडून आंदोलन करण्यात येत असून पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला आहे. यावेळी अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावचं वातावरण निर्माण न होण्यासाठी पोलिसांकडून दखल घेतली जात आहे.

गरूवारी राष्ट्रीय तपास संस्थेने PFIच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकून १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील व्हिडिओही व्हायरल झाला आहे पण पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तर PFI च्या अटक केलेल्या आरोपींकडून अनेक मोठमोठे खुलासे होऊ लागले आहेत. PFI कडून मुस्लीम तरूणांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं PFIचं लक्ष्य असल्याचं ATSच्या तपासातून समोर आलं आहे.

हे ही वाचा:

भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात ; नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version