जर मला विचाराल नोटेवर कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे; अनिल परब

जर मला विचाराल नोटेवर कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे; अनिल परब

सध्या राजकारणात नोटेवर कोणाचा फोटो छापला पाहिजे यावरून मोठी चर्चा रंगली आहे. अनेक नेतेयांकडून नोटेवर कोणाचे फोटो लावले पाहिजे हि चर्चा सुरू असतांनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सध्या देशात नोटांवर कोणत्या महापुरुषांचे फोटो पाहिजेत यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही आपलं मत व्यक्त केलं. जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे.

शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब म्हणाले, “ नोटेवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असंच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही. शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्यावर काय असायला पाहिजे, हे जाणूनबुजून निर्माण केलेले वाद आहेत.”

निर्मला सीतारामन यांनी यावर असं सांगितलय की, रुपया घसरत नाहीए डॉलर मजबुत होतोय. यावर आपण बघताय व्हॉट्स अॅपवर बरेचसे मेसेज फिरत आहेत. विविध पद्धतीने त्यावर टीका होते आहे. परंतु आपल्या देशाचं मूल्यमापन हे आपल्या रुपयावरती अवलंबून असतं आणि तो केवळ रुपया घसरत नाही तर देश घसरतोय. त्यामुळे सरकारने याची काळजी घेतली पाहजे असं एक सर्वसाधरण नागरिक म्हणून, करदाता म्हणून मला वाटतं.” असंही अनिल परब यांनी यावेळी सांगितलं. तर शिवसेनेत बंड करुन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंसोबत अपक्ष आमदार बच्चू कडू देखील गेले. त्यावेळी शिंदेंसोबत असलेल्या आमदारांवर रोख रक्कमेचे खोके घेतल्याचा आरोप झाला होता. यावरुन आता आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, असं विधान करत त्यांना या लढाईसाठी शुभेच्छाही दिल्या.

हे ही वाचा :

काश्मीरच्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला दिले आव्हान; गिलगिट बाल्टिस्तान भारतात येणारच

सपाचे ‘आझम खान’ यांना चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणात ३ वर्षांची शिक्षा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version