राज्यातील सत्तानाट्याचे कलाक्षेत्रावर पडसाद; ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘५० खोके एकदम ओके’ ही दोन नाटके लवकरचं रंगभूमीवर दाखल

राज्यातील सत्तानाट्याचे कलाक्षेत्रावर पडसाद; ‘मला काही सांगायचंय’ आणि  ‘५० खोके एकदम ओके’ ही दोन नाटके लवकरचं रंगभूमीवर दाखल

महाष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी तर घडतंच आहेत पण त्याचबरोबर राजकारणाचे पडसाद आता कलाक्षेत्रावरही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता रंगभूमीवरही महाराष्ट्राचं राजकारण रंगणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘मला काही सांगायचंय’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. हे नाटक एकपात्री असणार आहे ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास नाट्याच्या आधारित सादर केला जाणार आहे. ‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ हे नाटक डॉ. प्रदीप ढवळ (Dr. Pradeep Dhawal) यांनी लिहिलं असून ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते अशोक समेळ (Ashok Samel)यांचे चिरंजीव अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) हा दीर्घांक सादर करणार आहेत. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत या नाटकाची अधिकृत घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली जाईल.

दुसरीकडे ‘५० खोके एकदम ओके’ हे नाटक सुद्धा लवकरचं रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘५० खोके एकदम ओके’ या नाटकांच्या शीर्षकावरूनच विषय स्पष्ट मांडणारे हे नाटक म्हणजेच लोकनाट्य आहे अशी माहिती नाटकाचे सूत्रधार दीपक गोडबोले यांनी दिली. अनेक वर्षांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाच्या तोडीचे लोकनाट्य ‘५० खोके एकदम ओके’ हे रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे असे मत विश्वास गोडबोले यांनी मांडले. या नाटकाचे पोस्टर प्रचंड लक्षवेधी आहे. ‘काय ते रस्ते… काय ते खड्डे… तरी पण म्हणायचं… एकदम ओके’, असं या नाटकांच्या पोस्टरवर लिहिलं असल्यामुळे अधिकच लक्षवेधी ठरत आहे. त्याचसोबत ‘कलाकार- सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे’ असे त्यावर लिहिलं आहे.

आता काही दिवसांतच ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या राजकीय जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे. ‘धर्मवीर २’ मध्ये एकनाथ शिंदे यांचीही भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे आता कलाक्षेत्रातही राजकारणाचे पडसाद उमटताना दिसणार आहेत अशीच सर्वत्र चर्चा रंगत आहे.

One Nation, One Election: जर निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? Raj Thackeray यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version