spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : “Home guard जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा” ; Satyajeet Tambe यांनी सभागृहात केली मागणी

महाराष्ट्रात वेळोवेळी या होमगार्डस जवानांना वर्षभर काम देण्याची मागणी करण्यात आली होती, त्याचबरोबर त्यांना निश्चित वेतन मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू होते. सध्या होमगार्ड्सला कोणत्याही प्रकारचे निश्चित वेतन नाहीये. ज्या दिवशी काम असते, त्याच दिवसाचे पैसे त्यांना मिळतात. इतर दिवशी त्यांना रोजगाराचे दुसरे साधन शोधावे लागत असल्यामुळे होमगार्ड जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे.

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आलं होता. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २८ जून रोजी सादर केला. त्यांनतर विधानसभा परिषदेत अनेक नवे मुद्दे लक्षवेधीच्या स्वरूपात मांडण्यात आले.  विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या.आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरला होता.

राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे राज्यात होमगार्डचा वापर केला जातो. मात्र होमगार्ड जवान अनियमित सेवेत असल्यामुळे जेव्हा गरज असते, तेव्हा काम दिले जाते. त्यामुळे अनेक वर्षापासून होमगार्ड जवानांची मागणी आहे की, किमान १८० दिवस काम मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो. होमगार्ड जवानांच्या या मागणी बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र गृह रक्षक दल (होमगार्ड) जवानांना किमान १८० दिवस काम देण्याचं निर्णय जाहीर केला होते. मात्र अजून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने तातडीने निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

राज्यामध्ये कोणताही सण असेल, वाहतुक पोलीसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलांतील जवानांना ड्युटी दिली जाते. सध्या पोलीसांना कायदा व सुवव्यवस्था राखण्यात मदत करण्यासाठी या जवानांची मदत घेतली जाते. त्याचबरोबर एखाद्या आरोपीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात किंवा त्यांना वैद्यकीय मदतीसाठी ने-आण करण्यात होमगार्डची मदत होते. राज्यात सध्या ५३ हजार होमगार्ड कार्यरत आहेत. होमगार्ड जवानांना देखील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

महाराष्ट्रात वेळोवेळी या होमगार्डस जवानांना वर्षभर काम देण्याची मागणी करण्यात आली होती, त्याचबरोबर त्यांना निश्चित वेतन मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू होते. सध्या होमगार्ड्सला कोणत्याही प्रकारचे निश्चित वेतन नाहीये. ज्या दिवशी काम असते, त्याच दिवसाचे पैसे त्यांना मिळतात. इतर दिवशी त्यांना रोजगाराचे दुसरे साधन शोधावे लागत असल्यामुळे होमगार्ड जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे.

हे ही वाचा:

SUDHIR MUNGANTIVAR यांनी विरोधकांना दिला ‘वाघनखांच्या करारावर’ करारी जवाब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss