पाटलांच्या शाईफेक प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

पाटलांच्या शाईफेक प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात शाईफेक झाली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी या घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या १० पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये एक पोलीस निरीक्षक (Inspector of Police) दोन पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) आणि इतर कर्मचारी आहेत. तर शाईफेक करणाऱ्यावरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर सगळीकडून टीकेची झोड उठली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवरील कलम ३०७ मागे घेण्याचा आदेश दिलाय. तसेच ११ पोलिसांचं देखील निलंबन मागे घेण्याचा आदेश फडणवीसांनी पोलिसांनी दिल्याची माहिती मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule), कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही पुण्यात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. एखादा शब्द पकडून त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. माफीनंतर टार्गेट करणं चुकीचं आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

हे ही वाचा : 

नोरा फतेहीच्या गंभीर आरोपावर जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचं स्पष्टिकरण

राजीनामा देण्यासाठी उदयनराजे दिल्लीला गेले असतील?,असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला

Avtar 2 : दिग्दर्शक जेम्स कॅमरुन तब्बल १३ वर्ष करत होता एकाच सिनेमावर काम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version