मंत्रीमंडळाच्या बैठकी दरम्यान महत्वाचे निर्णय, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान

राज्यात शिवसेना व शिंदे गटात सत्ता संघर्ष सुरु असताना, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्य मंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

मंत्रीमंडळाच्या बैठकी दरम्यान महत्वाचे निर्णय, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान

नांदेड, हिंगोली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर ?

मुंबई : राज्यात शिवसेना व शिंदे गटात सत्ता संघर्ष सुरु असताना,मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्य मंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रीमंडळच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नवे सरकार स्थापन झाल्या नंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधीपक्ष कडून सतत टीका केल्या जात आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत.

या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील भूमिहिन लोकांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे बेघर आणि भूमिहिन लोकांना हक्काचं घर मिळणार आहे. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ३७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. लोणार सरोवर जागतीक पातळीवरील पर्यटन स्थळ असून मागील अनेक दिवसांपासून याच्या संवर्धनासाठी निधीची मागणी होत होती. आज ती मागणी मान्य झाली आहे.

आगामी सणांविषयी महत्वाचे निर्णय

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक सार्वजनिक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण पसरले आहे. त्यात आगामी काळात सर्वांचा जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकाडून गणेशोत्सव उत्सवासाठी नियमावाली जाहीर करण्यात आली असून, गणेशोत्सवासाठी ३०हून अधिक नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति युनिट 1 रुपयांची वीज सवलत देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

बोरिवलीतील पोलीस वसाहतींचा मुख्यमंत्र्यांनी केला पाहणी दौरा

Exit mobile version