spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MIDC ने दिली महत्वाची माहिती; ठाकरे गटाच्या दिरंगाईमुळेच प्रकल्प…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. अशातच आता या गदारोळात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. अशातच आता या गदारोळात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे राज्यातून बाहेर गेल्या, uddhav ची माहिती हाती आली आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र आता हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या दुर्लक्षामुळेच बाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. MIDC कडून ही माहिती देण्यात आली आहे. साडेचार महिने ठाकरे सरकारकडून प्रकल्पविषयक कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. राज्यात प्रकल्प राहावा म्हणून काहीही प्रयत्न झाले नाही, असा खुलासा या अंतर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. जवळपास ४ प्रकल्प आजपर्यंत राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सातत्याने यावरुन सरकारच्या धोरणांवर टीका केली जात आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा सी-२९५ लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट (Tata Airbus Project) हा नागपूरमध्ये (Nagpur) होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प आता गेला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीकास्त्र सुरु आहेत आणि अश्यातच आता MIDCने हा एक नवीन खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन कोणते वळण मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा :

राशी भविष्य – २ नोव्हेंबर २०२२ – आपणांस आज दैवी उपासना करण्याची…

Gas Cylinder Blast : दादरच्या छबीलदासमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट

जळगाव दूध संघाची निवडणूक जाहीर; कोण मारणार बाजी? खडसे की गिरीश महाजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss