उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, हिवाळी अधिवेशनासाठी ठरणार रणनीती

उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, हिवाळी अधिवेशनासाठी ठरणार रणनीती

आज पासून महाराष्ट्रच्या हिवाळी आदिवेशनाला सुरवात झाली आहे. या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटात यासाठी जलद गतीने घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात (Nagpura) आज संध्याकाळी सहा वाजता ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये (Radisson Blue Hotel) ठाकरे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला कसं घेरावं याबाबत व्यूहरचना ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये त्यांचा दोन दिवस मुक्काम असणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे उद्या विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे. ते उद्या विधान भवनात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळाले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. विरोधकांनी ’५० खोके, एकदम ओक्के’च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. विरोधकांनी हातात बॅनर्स घेऊन घोषणाबाजी केली.

हे ही वाचा : 

Jayant Patil महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता इलॉन मस्कची एन्ट्री?

Messi Love Story जाणून घ्या मेस्सीची अनोखी लव्हस्टोरी

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version