सीमावादावर राज्यपालांची अमरावतीमध्ये महत्वाची बैठक

सीमावादावर राज्यपालांची अमरावतीमध्ये महत्वाची बैठक

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावरती जिल्ह्यांबाबत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी दोन्ही राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांची संयुक्त बैठक अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सुरू झाली आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आंदोलन होण्याची शक्यता असल्याने ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर महाराष्ट्रातील भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशातील बालाघाट, शिवनी, शिंदवाडा, बैतुल, बुरानपुर,खंडवा, हारगोन, बडवाणी आणि अलीराजपूर या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे.

यापैकी महाराष्ट्रातील नागपूर अमरावती बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातून थेट मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नियमित वाहतूक होते. अमरावती जिल्ह्यातून बैतूल खंडोबा बऱ्हाणपूर शिंदवाडा या जिल्ह्याचा दळणवळण होत असते.

ठाकरे गटाकडून निदर्शनं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न आज अमरावतीत (Amravati) करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांना चप्पल दाखवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

हे ही वाचा : 

Maharashtra Shahir ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील साने गुरुजींचा पहिला लूक आऊट

Paris Olympics 2024 साठी फ्रान्स घेणार AI सुरक्षा आणि नियंत्रण पध्द्तीची मदत

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version