दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाला धक्का, बंडानंतर पहिल्यांदाच गटप्रमुखांना उद्धव ठाकरे संबोधणार

दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाला धक्का, बंडानंतर पहिल्यांदाच गटप्रमुखांना उद्धव ठाकरे संबोधणार

उद्धव ठाकरे

यंदा दसरा मेळाव्या आधीच उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे. ठाकरेंचा आवाज संपूर्ण देशभर घुमणार असा हा मेळावा असणार आहे. कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा ठरणार आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भात्यातल्या शस्त्रांसह रणांगणांत उतरतील का असा प्रश्न सर्वाना पडला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे.

Doctor Ji Movie : आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित, पहा स्त्रीरोग तज्ज्ञचा संघर्ष

गेली अनेक वर्ष सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या सामोरे आहे. पण हे आव्हान आता तितकंस सोपं नसणार आहे. कारण शिवसेनेतला शिंदे गट आता वेगळा होऊन तो भाजपसोबत सध्या सत्तेत आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप, मनसेसह शिंदेगटाचं आव्हान असणार आहे. तेव्हा आपला गड मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात उतरणार आहे.

सोशल मीडियावर शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन

शिवसेनेने आता दसरा मेळाव्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. तसंच या पोस्टरवर दसरा मेळाव्याचा पत्ता शिवाजी पार्क हाच देण्यात आला आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा सध्या होऊ लागली आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे लाँच होणार असल्याचं दिसत आहे.

 

Paithan : मुख्यमंत्र्यांना गावात आणण्यासाठी एका तरुणाने जिवाच्या आकांताने केले प्रयत्न

या पोस्टरमधून “आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाही, चलो शिवतीर्थ” असा संदेशही देण्यात आला आहे. दसरा मेळाव्याची जागा अद्यापही ठरलेली नाही. शिवाजी पार्कवर होणार की आणखी कुठे याबद्दलची चर्चा आता सुरू आहे. यापूर्वीही दसरा मेळाव्याचे पोस्टर शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आले होते. जर शिवाजी पार्क मिळालं नाही, तर रस्त्यात उभं राहून भाषण करण्याची तयारीही उद्धव ठाकरेंनी दर्शवली आहे.

अखेर तीन दशकांनंतर, काश्मीरमध्ये गुंजणार बॉलिवूडचा आवाज!

Exit mobile version