शिंदे गटाचा दसरा मेळाव्या संबंधित आज महत्त्वाची बैठक, शिवाजी पार्क शिवाय इतर जागांची चाचपणी सुरु

शिंदे गटाचा दसरा मेळाव्या संबंधित आज महत्त्वाची बैठक, शिवाजी पार्क शिवाय इतर जागांची चाचपणी सुरु

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काढून दसरा मेळावा हा फक्त आमचाच असा ठाम मत मांडला जात आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते.

हेही वाचा : 

रस्त्यात अचानक पेटती गाडी पाहत मुख्यमंत्र्यांनी थांबवला आपल्या गाडीचा ताफा

दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटानं आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान काल १२ सप्टेंबर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? हे पहावं लागेल. दरम्यान मुंबई महापालिकेनं दोन्ही गटाच्या अर्जाची छाननी सुरु आहे. आणि आयुक्त कुणाच्या बाजूनं निर्णय देतात हे पहावं लागेल.

मुंबई-उपनगरात पाऊस सुरूच, लोकल सेवेवर परिणाम

शिंदे गटाच्या बैठकीचे आज आयोजन करण्यात आलं आहे. चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वास्तूत ही बैठक आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीला सर्व मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत दसरा मेळाव्याला जर शिवाजी पार्कची जागा मिळाली नाही तर इतर जागेवर दसरा मेळावा घेण्यावरही चर्चा होणार आहे. शिंदे गटाकडून शिवाजी पार्क आणि बीकेसीतल्या जागेसाठी अर्ज करण्यात आला आहे.

आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा करण्याची पद्धत

Exit mobile version