अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा ठराव मंजूर

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा ठराव मंजूर

आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यातच आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धारशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामंतरावर आक्षेप घेण्यात आला होता, नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आल्या होत्या.

… त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले, आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा दावा याचिकाकर्ते यांनी केला होता. तसेच हा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे. फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असेही याचिकेत नमुद करण्यात आले होते.

या ठरावांनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “आज छत्रपती संभाजीनगर, दि. बा. पाटील विमानतळाच्या नावाचे ठराव झाले. त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचाही ठराव झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारने या ठरावांसोबत त्याचाही पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ते नावही देण्यात यावं.” असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

 

हेही वाचा : 

अजित पवार आणि आंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी

Exit mobile version