अखेर शिंदेंच ठरलं, ‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार

अखेर शिंदेंच ठरलं, ‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार

शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिका ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाचा अवलंब करण्याची शक्यता होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली नाही, तर ते वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजन करण्याच्या तयारीत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सांगितलेहोते. परंतु, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

हेही वाचा : 

शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या अडचणीत वाढ, कोर्टाने बाजवली नोटीस

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला आहे. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत.आणि याच पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत मंत्र्यांशी चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला. तसेच हा मेळावा यशस्वी करण्यासाठी,मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने चर्चा झाली. याचबरोबर पोलीस ठाण्याजवळ गोळीबाराचा आरोप आमदार सदा सरवणकर यांच्यावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर चुकीचे वागू नका, अशी महत्वपूर्ण सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वाना दिली.

राशी भविष्य १४ सप्टेंबर २०२२, मिथुन राशीच्या लोकांनी पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिवाजी पार्कवर पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटानेही त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेसाठी अर्ज केला होता. त्यानंतर बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावरही शिंदे गटाने परवानगीसाठी अर्ज केला. शिवाजी पार्कवर विजयादशमी अर्थात ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी बीएमसीने अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही.

सतत तहान लागणे शरीरासाठी हानिकारक, जाणून घ्या लक्षणे

Exit mobile version