‘दिल्लीत ‘रात्रीस खेळ चाले… ?’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल दि. २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

‘दिल्लीत ‘रात्रीस खेळ चाले… ?’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल दि. २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान फटकेबाजी केली. तसेच शिंदे गटानेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी टाईट फिल्डींग लावल्याचं मेळाव्यावरून दिसून येत आहे. मुंबईत भाजप आणि अमित शाहांना मिटवून टाकू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच या दरम्यान काल दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेट झाल्याच्या चर्चा देखील होत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यात मध्यरात्री बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं सांगण्यात येत असून त्यांच्यात नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली ही माहिती समोर आली नाही. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि शिंदे गटाला आपलं म्हणणं मांडण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे ती मुदत जवळ येत असून सुप्रीम कोर्टातही या वादावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शाहा आणि शिंदे यांच्यातील भेट महत्त्वाची ठरू शकते.

नवी दिल्लीत काल (बुधवारी) पार पडलेल्या राज्यप्रमुखांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल महाराष्ट्रासाठी रवाना होणार होते पण त्यांच्या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला आणि ते दिल्लीतच थांबल्याची माहिती आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र सदनातून २० मिनीटे बाहेर होते. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि त्यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत घुमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आवाज, राज्यप्रमुखांच्या मेळाव्याला शिंदे संबोधणार

Uddhav Thackeray : सत्तासंघर्षानंतर शिवसेनेचा पहिलाच मेळावा; भाजपवर केला जोरदार हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version