नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का, तब्ब्ल ५० पदाधिकारी शिंदे गटात

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का, तब्ब्ल ५० पदाधिकारी शिंदे गटात

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत. अनेक जिल्यामध्ये ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षामध्ये जाताना दिसून येत आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्षाकमधील पक्षाची हि गळती थांबविण्यासाठी संजय राऊत हे स्वतः नाशिकमध्ये जाणार होते . परंतु त्याच पूर्वी ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का हा बसला आहे.

ठाकरे गटातील राज्यातील पदाधिकाऱ्यांची गळती काही थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाला अनेक नगरसेवकांनी रामराम केल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का हा बसला आहे. नाशिकमधील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामध्ये नाशिकमधील ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख, उपमहानगरप्रमुख, विभाग प्रमुख असे ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे.

ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याने मोठी देवकेदुखी हि वाढली आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील पक्ष गळती थांबवण्यासाठी, पक्ष बांधणी करण्यासाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी संजय राऊत नाशिकला येत आहेत. परंतु त्याआधीच नाशिकमधील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. तसेच आगामी काळात पडझड होऊ नये म्हणून संजय राऊत काय मार्ग काढतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नवं वर्षांत जोमाने कमला लागलेले लवकरच दिसून येणार आहे. कारण उद्धव ठाकरे हे स्वतः नाशिक मध्ये उपस्थित राहणार आहेत. जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात एक जाहीर सभा हि घेण्यात येणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे आता वारंवार नाशिक दौरे हे सुरु असणार आहेत. त्यामुळे संजय राऊतांच्या समोर आता एक मोठं आव्हान उभं राहील आहे.

हे ही वाचा:

Covid 19, चीनमध्ये वाढतोय कोरोनाचा उद्रेक, भारतातील स्थिती घ्या जाणून

पत्रकार दिनानिमित्त जाणून घ्या कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी महाराष्ट्राला दिले पहिले वृत्तपत्र?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version