spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती…… शरद पवारांचे वक्तव्य

भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari)हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असायचे. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना विरोधकांकडून मोठा विरोध झाला होता.

भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari)हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असायचे. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना विरोधकांकडून मोठा विरोध झाला होता. भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले नेहमी चर्चेत राहणारे राज्यपाल ठरले आहेत.
भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Droupadi Murmu)यांनी राज्यपालांचा राजीनामा स्वीकारला यानंतर विविध पक्षांनी या राजीनाम्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress)पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या राजीनाम्यावर दिली. त्यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता ,कोश्यारींनी राजीनाम्याविषयी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हायला हवी, असे देखील माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती अशी व्यक्ती मी पहिल्यांदा पहिली असे वक्तव्य त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याबाबत केले. केंद्र सरकार(Central Govt) आणि राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर करून चांगले काम केले आहे अशी समाधानकारक प्रतिक्रिया शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिली. तसेच आज राज्यपाल या जागी रमेश बैस(Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात अली आहे. नवीन राज्यपाल राज्याचा कारभार कसे सांभाळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

IND vs PAK T20, उद्या रंगणार महिला विश्वचषकात भारत-पाकिस्तान मुकाबला, जाणून घ्या सविस्तर

Anil Deshmukh नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss