नितेश कुमार व शरद पवार यांच्या भेटीत, भाजप विरोधात आघाडी होणार?

नितेश कुमार व शरद पवार यांच्या भेटीत, भाजप विरोधात आघाडी होणार?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट सुमारे ४० मिनिटे चालली. या बैठकीनंतर नितीश कुमार म्हणाले की, आपण एकत्र निवडणुका लढलो तर देशाच्या विकासासाठी चांगले होईल. आपल्यासाठी एकजूट असणे खूप महत्वाचे आहे. आमचे वैयक्तिक काहीही नाही, आमचे एकच उद्दिष्ट आहे की सर्वांनी एकत्र आले तर देशाचे भले होईल. सर्व पक्षांशी बोलल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले. देश काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक (भाजप) प्रचारात गुंतले आहेत.

हेही वाचा : 

T20I खेळाडूंच्या क्रमवारीत बाबरला मागे टाकत रिझवान बनला नवा बादशाह

सोनिया गांधींच्या भेटीवर काय बोलले?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत नितीश कुमार म्हणाले की, मॅडम (सोनिया गांधी) परदेशातून आल्यावर त्यांना भेटण्यासाठी खास दिल्लीत येतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, ते येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट हे या संवादाचे प्रमुख कारण आहे. जेणेकरून 2024 मध्ये भाजपचा विजय रथ रोखता येईल. बुधवारी शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी नितीशकुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांची भेट घेतली.

नितीशकुमार यांनी गेल्या महिन्यात बिहारमध्ये भाजपसोबतची युती तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून विरोधक सातत्याने एकजुटीवर भर देत आहेत. नितीश कुमार यांनी मंगळवारी म्हटले होते की, ते पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत किंवा त्यासाठी इच्छुकही नाहीत, परंतु भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करणे हे त्यांचे ध्येय आहे.

नुकतेच शरद पवार यांनीही आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी ते म्हणाले होते की, विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी सातत्याने चर्चा सुरू आहे.

 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, थेट जनतेतून सरपंचाची निवड

याआधी मंगळवारी त्यांनी गुडगावमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये सपाचे निमंत्रक मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली होती. यावेळी सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही तेथे उपस्थित होते. मुलायमसिंह यादव यांना भेटण्यापूर्वी त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचीही भेट घेतली.

नितीश यांनी राहुल गांधी आणि केजरीवाल यांचीही भेट घेतली आहे.बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. यानंतर मंगळवारी त्यांनी आम आदमी पार्टीचे (आप) निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. केजरीवाल यांच्या आधी कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सरचिटणीस डी. राजा यांची त्यांच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली होती.

सैफ अली खान विक्रम वेधा चित्रपटाच्या ट्रेलर पूर्वावलोकन दिसला

Exit mobile version