लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, संभाजी नगरमध्ये जाहीर सभा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेते त्यांच्या त्यांच्या पक्षातील मतदार संघांचा दौरा करता आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, संभाजी नगरमध्ये जाहीर सभा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेते त्यांच्या त्यांच्या पक्षातील मतदार संघांचा दौरा करता आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना भाजपचे दिल्लीमधील नेते महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या नेत्यांमध्ये आता अमित शाह यांची भर पडली आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अमित शहा अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ५ मार्च रोजी अमित शाह अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते जळगावमधील युवासंमेलनाला देखील जाणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी नगरमध्ये शाह यांची जाहीर सभा होणार आहे. अमित शाह ४ आणि ५ मार्च रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. सोमवार ४ मार्च रोजी रात्री १० वाजून १० मिनिटांनी त्यांचे छ्त्रपती संभाजी नगर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते हॉटेल राम इंटरनॅशनलमध्ये जाऊन मुक्काम करणार आहेत. ५ मार्च रोजी ते सकाळी १०.३५ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळवरून हेलिकॉप्टरने अकोलाकडे जाणार आहेत. अकोला आणि जळगाव मधील नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी ५.४० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून ते रामा इंटरनॅशनल येथे जाणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल मधून ते क्रांती चौककडे जाणार आहेत. क्रांती चौकात गेल्यानंतर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण,करून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे जाणार आहेत. तिथे संध्याकाळी ७.३० मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन ते छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे जाणार आहेत. त्यानंतर ७. ४५ मिनिटांनी विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते विदर्भातील ६ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ते अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता बैठक आटपून जळगावच्या सभेसाठी रवाना जाणार आहेत. तिथे त्यांची सभा झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांच्या दुसऱ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Lok Sabha 2024 : बारामतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला?, सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार आमने सामने?

अभिनेत्री शिल्पा ठाकरेचा ‘भागीरथी missing’ महिला दिनी होणार प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version