spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंतप्रधान मोदींच्या या वाढदिवसाला बेरोजगारी विरुद्धच्या आंदोलनाची सुरुवात

पंतप्रधान मोदींच्या या वाढदिवसाला बेरोजगारी विरुद्धच्या आंदोलनाची सुरुवात....

वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प हा सध्या राजकीय वर्तुळात अत्यंत तापलेला विषय आहे. महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असणारा आणि महाराष्ट्रात होणार हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर विरोधक कडाडून टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने शिंदे सरकारला धारेवर धरलंय. तसेच विरोधी पक्षांकडून या प्रकल्पामुळे अनेक टीका देखील केल्या जात आहेत. याच नाराजीचा, विरोधाचा एक भाग म्हणून आता जालन्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा जालन्यातील काँग्रेस पक्षातील युवक एका वेगळ्या पद्धतीने या प्रकल्पाचा विरोध करणार आहे. फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा विषय असून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी या कंपनीतर्फे चांगल्या रोजगाराच्या संधी हिरवल्या जात आहेत. मागील वर्षीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिवस असा ट्विटरवर ट्रेंड दिसून आला होता. आता वेदांता प्रकल्पामुळे हा ट्रेंड पुन्हा एकदा दिसून येणार असं दिसतंय.

येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजपातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत नेल्याने जालन्यातील युवक काँग्रेस कार्यकर्ते निषेध व्यक्त करणार आहेत. एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने एक लाख लोकांना रोजगार मिळणार होता तो मिळणार नाही. युवक काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा दिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करणार, अशी माहिती युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष कुणाल राऊत यांनी जालन्यात दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या या वाढदिवसाला बेरोजगारी विरुद्धच्या आंदोलनाची सुरुवात पुणे आणि मुंबईत होणार असून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरात मोर्चा काढला. तर पुण्यातही खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मुंबईत काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकडही झाली. तर राज्यभरात युवा सेनेतर्फे ‘खोके सरकारच्या या कृतीचा निषेध’ अशा आशयाच्या बॅनरवर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. मुंबईसह, पुणे, नाशिक, परभणी आदी जिल्ह्यांत या मोहिमेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

हे ही वाचा:

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

तरूण तरूणींनी सरकार विरोधात पेटून उठले पाहिजे – अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss