पंतप्रधान मोदीच्या हस्ते आज ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन करणार आहेत. हा कर्तव्य पथ सुमारे ३ किलोमीटरचा आहे.

पंतप्रधान मोदीच्या हस्ते आज ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन करणार आहेत. हा कर्तव्य पथ सुमारे ३ किलोमीटरचा आहे. त्यावर ४,०८७ झाडे आहेत. त्यावर ११४ आधुनिक बोर्ड आहेत. तर ९०० हून अधिक दिवे बसवले आहेत. ८ फीचर ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्याचे क्षेत्रफळ १,१०,४५७ चौरस मीटर आहे. काँक्रीटचे ९८७ जाडीचे खांब आहेत. याशिवाय त्यात १४९० मॅनहोल करण्यात आले आहेत. ४ पादचारी अंडरपास करण्यात आले आहेत. लाल ग्रॅनाइटचे ४२२ बेंच आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा ग्रॅनाईटचा पुतळा नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाला श्रद्धांजली आहे आणि राष्ट्राच्या त्यांच्या ऋणानुबंधाचे प्रतीक असेल. असं मोदी म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अरुण योगीराज यांनी तयार केला, जे मुख्य शिल्पकार आहेत. २८ फूट उंच पुतळा एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडात कोरलेला आहे आणि त्याचे वजन ६५ मेट्रिक टन आहे. NDMC ने गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून ठराव मंजूर करून ‘राजपथ’ चे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ केले आहे. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला ‘कर्तव्यपथ’ असे म्हटले जाईल.

कर्तव्यपथ मध्ये सुंदर लँडस्केप, लॉन, नूतनीकरण केलेले कालवे, नवीन सुविधा ब्लॉक्स, सुधारित चिन्हे आणि वेंडिंग किऑस्क आहेत. याशिवाय, पादचारी अंडरपास, सुधारित पार्किंगची जागा, नवीन प्रदर्शन फलक आणि रात्रीची प्रकाश व्यवस्था ही इतर काही वैशिष्ट्ये आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवणे, जलसंवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाशयोजना अशा अनेक सुविधांचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पेट्रोल-डिझेल पुन्हा दिलासा देणार, इंधनाच्या किमतीत मोठी कपात होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version