मानखुर्दमध्ये आज शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

शिंदे गटाचे मुख्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांनी एकमेकांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले आणि तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) देखील झाला.

मानखुर्दमध्ये आज शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

मुंबई :- शिंदे गटाचे मुख्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांनी एकमेकांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले आणि तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) देखील झाला. आता शिंदे गट (Eknath Shinde Group) आपली शाखा सुरू करणार आहे.

शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचे सांगत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावे असा तर्क यासाठी शिंदे गटाकडून देण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून शाखा सुरू करण्यात येत आहेत. शनिवारी, १३ ऑगस्ट रोजी मानखुर्दमध्ये बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून मुंबईत शिंदे गटाची पहिली शाखा सुरू (Shinde Group Shivsena Branch in Mumbai) करण्यात येत आहे. शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या मतदारसंघातील मानखुर्दमध्ये ही शाखा सुरू होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटानेही तयारी सुरू केली असल्याचे हे चिन्हं असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुंबईतील शाखांना भेट देण्यास आदित्य ठाकरे यांनी सुरुवात केली. त्याशिवाय, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांनीदेखील काही शाखांना भेटी दिल्या. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना कार्यक्रम या शाखांच्या माध्यमातून दिले जाते. त्यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत शाखांचे महत्त्व मोठे आहे. अशातच आता, शिंदे गटानेही मुंबईत शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखांना कसा प्रतिसाद मिळतो, मुंबई महापालिका निवडणुकीत याला कसा प्रतिसाद मिळतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा :-

समीर वानखेडे जन्मतः मुस्लीम नाही, समितीचा निकाला

Exit mobile version