Sanjay Raut : खा.संजय राऊतांच्या यंदा दिवाळी फराळ कोठडीतच, अजूनही दिलासा नाहीच

Sanjay Raut : खा.संजय राऊतांच्या यंदा दिवाळी फराळ कोठडीतच, अजूनही दिलासा नाहीच

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांना यंदाची दिवाळी ही जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ नोव्हेंबरला होणार आहे.

राऊतांच्या जामिनाच्या सुनावणीवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. राऊतांना भेटायला येणाऱ्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात असतो. वैयक्तीक कामानिमित्ताने एकनाथ खडसे दोन दिवसांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात गेले होते. यावेळी राऊतांच्या जामीनावर कोर्टात सुनावणी सुरु होती. यावेळी या दोघांची कोर्टाच्या लिफ्टजवळ एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची भेट झाली.

हेही वाचा : 

कृष्णा-अर्जुन जिहादच्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणतात- ‘मी फक्त हे विचारले’

३१ जुलै २०२२ रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर सकाळी ७ वाजता ईडीने धाड टाकली. तब्बल साडेनऊ तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर राऊत यांची दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी राऊतांना अटक झाली. त्यानंतर आत राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली.

ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. आज सायंकाळपर्यंत संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी अजून काही मुद्दे लेखी सादर करणार आहे. मात्र हे प्रकरण अत्यंत कॉम्लिकेटेड असल्यानं मलाही याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांना जेलमध्येच मुक्कामी थांबावे लागणार आहे.

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमश्चक्री सुरु…

Exit mobile version