spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खा.संजय राऊतांचा गरबा तुरुंगातच, न्यायालयाच्या ‘या’ निर्णयनाने शिवसेनेला धक्का

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक झाली होती. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. त्याच बरोबर त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी देखील झाली. मात्र संजय राऊत यांना जामीन मिळू नये, अशी ईडीचा भूमिका मांडळी. राऊतांच्या जामीनाला ईडीचा विरोध आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात राऊतांना हजर केलं गेलं. मात्र न्यायालयीन कोठडीने संजय राऊतांना अजूनही दिलाच नाही. राऊतांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा : 

नंदुरबारमध्ये भाजपचा धुरळा,शिंदे विरुद्ध लढतमध्ये भाजप आघाडी, ९ ग्रामपंचायतींवर कमळ फुलणार

एकीकडे शिवसेना आपल्या अस्तित्वासाठीची कायदेशीर लढाई लढत आहे. या पक्षातल्या ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट पक्षातून बाहेर पडला. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यात बंडखोर गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केल्याने पक्ष आणखी कोंडीत सापडला आहे. उद्धव ठाकरेंनी या धक्क्यांनंतर सावध पवित्रा घेत उर्वरित पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवलं आहे.

gram panchayat election result : संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं, तर धुळ्यात भाजपचं निर्विवाद यश

पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरण

हे प्रकरण गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. या फर्मने घेतलेल्या ६७२ भाडेकरूंसाठी प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित आहे. जेथे संजय राऊत यांचे निकटचे सहकारी प्रवीण राऊत संचालकांपैकी एक होते. या प्रकल्पातून प्रवीण राऊत यांना ११२ कोटी रुपयांचा फायदा झाला आणि त्यातील काही रक्कम संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीकडे वळती केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Raj Thackeray Live : वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा, राज ठाकरेंचा हल्लाबोल

Latest Posts

Don't Miss