Ind vs Ban : भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी दणदणीत विजय

Ind vs Ban : भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी दणदणीत विजय

चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध भारत (India) या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः धावांचा पाऊस‌ पाडला. बांगलादेश विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ ने गमावली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. इशान किशनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मेहिदी हसन मिराजला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ईशान किशनच्या (Ishan Kishan) वादळी द्विशतक आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकानंतर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं तिसरा आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात २२७ धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं बांगलादेशसमोर ४१० धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या संघाला अवघ्या १८२ धावांवर रोखलं.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. भारताला ४.१ षटकात सलामीवीर शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का लागला. मात्र, त्यानंतर ईशान किशन आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारी रचत भारताची धावसंख्या ३०० पार पोहचवण्यात मदत केली. भारताच्या डावातील ३६ षटकातील अखेरच्या चेंडूवर ईशान किशन आऊट झाला. एका बाजूनं पाठोपाठ विकेट पडत असताना विराट कोहलीनं संघाची दुसरी बाजू संभाळून ठेवली. या सामन्यात श्रेयस अय्यर (३ धावा) आणि कर्णधार केएल राहुल (८ धाव करून बाद झाला. त्यानंतर ४१व्या षटकात विराट कोहलीदेखील शाकीब अल हसनच्या गोलंदाजीचा शिकार झाला. भारतानं निर्धारित ५० षटकात ८ विकेट गमावून बांगलादेशसमोर ४१० धावांचं लक्ष्य ठेवलं. बांगलादेशकडून तस्कीन अहमद, हुसेन आणि शाकीब अल हसननं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, मुस्ताफिजुर रहमान आणि मेहंदी हसनच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.

हे ही वाचा : 

शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांनी दिली पहिली पतिक्रिया

सीमावादावर सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version