spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर छगन भुजबळांची सूचक प्रतिक्रिया

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा फुले (Mahatma Phule) आणि कर्मवीर भाऊराव (Karmaveer Bhaurao Patil) पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येच (Pimpri-Chinchwad) त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी म्हटलं कि, ते कार्यकर्ते कोणाचे होते याबाबत मला काही माहिती नाही, परंतु हे स्वाभाविक आहे की ते फुले-शाहू-आंबेडकरांचे अनुयायी, कार्यकर्ते निश्चितपणे असणार. मागील काही दिवसांपासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाईंचं, महात्मा फुले आणि आता परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात सातत्याने काही चुकीची जी वक्तव्ये आहेत, मंत्री किंवा इतर ज्येष्ठ नेते करत आहेत. त्यामुळे या वर्गात राज्यात फार असंतोष निर्माण झालेला आहे. आपण पाहत आहोत, ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, निषेध होतो आहे.” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले माझं म्हणणं एवढच आहे की, देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की, महापरुषांच्या बाबतीत बोलताना शब्द अतिशय जपून वापरण्याची आवश्यकता आहे. कोणाचा अपमान होणार नाही, कुणाची मनं दुखावणार नाहीत, त्यांच्या अनुयायांना राग येणार नाही, असं आपण बोलताय कामानये. चुकीची सातत्याने विधानं केल्याने एकुणच वातावरण थोडसं गरम आहे आणि परत अशी काही विधानं केली जातात. असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

हे ही वाचा : 

चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

तमिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा, ४ जणांचा मृत्यू

Nagpur ते Shirdi ५ तासांत, …असा असेल समृद्धी महामार्गाचा प्रवास | Samrudhi Mahamarg Route |

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss