Wednesday, September 25, 2024

Latest Posts

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर श्रीकांत शिंदेंचे सूचक विधान

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गट प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल,

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गट प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंत तर शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासर्व प्रकारणी एकनाथ शिंदे पाठोपाठ त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे.

हे ही वाचा :  सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

श्रीकांत शिंदेनी शिवसेनेला लगावला टोला –

निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती द्यावी ही शिवसेनेची याचिका अखेर फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा मार्ग सुखकर झाल्याचे बोलले जात आहे. या दरम्यानच खा. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. पण आता मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हणत शिंदे गटाच्या अडचणी आता दूर झाल्याचे सांगितले जात आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांचाच विजय होणार असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेला टोलाही लगावला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर –

आपल्या समोरचे पुरावे बघून ते योग्य ते निर्णय देतील असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच पुढे ते म्हणाले त्यांची याचिका फेटाळणं हे त्यांना मिळालेले उत्तर आहे . असं आपण समजलं पाहिजे. आता जो निर्णय झाला तो अतिशय योग्य असा निर्णय झाला आहे त्यामुळे सर्वांनीच त्याचे स्वागत केले पाहिजे. असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्तय केले आहे.

हे ही वाचा:

पृथ्वीला धोका निर्माण करणाऱ्या उल्केशी थेट टक्कर देणारे स्पेसशिप : नासाने केलेल्या चाचणीत यश..!

१ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे महागणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss