साध्या पोलिसांकडून चौकशी करा सगळं हाती येईल, संजय राऊतांचा भुसेंना टोला

भाजपचे नेते इतरांकडून हिशोब मागतात त्या पोपटलालांनी इथे यावे आणि पालकमंत्र्याकडून हिशोब मागावा. ईडीने जर साध्या पोलिसांकडून चौकशी केली तरी, भरपूर हाती येईल, असं सांगत संजय राऊत यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांना टोला लगावला आहे.

साध्या पोलिसांकडून चौकशी करा सगळं हाती येईल, संजय राऊतांचा भुसेंना टोला

भाजपचे नेते इतरांकडून हिशोब मागतात त्या पोपटलालांनी इथे यावे आणि पालकमंत्र्याकडून हिशोब मागावा. ईडीने जर साध्या पोलिसांकडून चौकशी केली तरी, भरपूर हाती येईल, असं सांगत संजय राऊत यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांना टोला लगावला आहे. तसेच पोलिसांकडून चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. आज उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. यादरम्यान विधासभेचे अधिवेशन सुरु असताना संजय राऊत यांनी ट्विट करत आरोप केले की, गिरणा अग्रो (Girana Agro) नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले, अशा आशयाचे ट्विट करत लवकरच स्फोट होईल असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आज संजय राऊत यांनी पुन्हा या संदर्भात भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांनी पालकमंत्र्यांकडून हिशोब मागावा असे ते म्हणाले आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मी पालकमंत्र्यांवर आरोप केले नाही, सत्य सांगितले आहे. पालकमंत्री यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना संदर्भात शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतले. हिशोब दिला नाही, पैसे कुठे आहेत, कोणत्या नेत्यांशी डिल केली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, हा प्रश्न आम्ही विचारला तर गैर काय? हा हिशोब नेत्यांनी दिला पाहिजे. भाजपचे नेते इतरांकडून हिशोब मागतात, त्या पोपटलालांनी इथे यावे आणि पालकमंत्र्यांकडून हिशोब मागावा. ईडी नंतर, आधी साध्या पोलिसांकडून चौकशी केली तरी भरपूर हाती येईल असे सांगत दादा भुसे यांच्या चौकशीची मागणी संजय राऊत यांनी केली. मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून आम्ही मालेगावमध्ये सभा घेत आहोत. इकडचे लोक पार्श्वभागाला पाय लावून पळाले म्हणून, जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकताच अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नवी संजीवनी मिळाली आहे. देश अखंड आहे, फोडा जोडा, चालणार नाही. उध्दव ठाकरे महाराष्ट्र आणि देशाच्या प्रश्नांना जाहीरपणे उत्तर देण्यासाठी येत आहेत. मी राजीनामा देईल, मात्र तुम्ही आधी शिवसेनेच्या मतावर निवडून आलात, आधी तुम्ही राजीनामा द्या, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेन मतदान केले मग तुम्ही कसे काय लावून पळून गेलात. तुम्ही राजीनामा द्या तुम्ही शिवसेनाचे आमदार नाहीत, निवडणूक आयोगाने चिठोरे दिले असल्याचे सांगत संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना संजय राऊत यांनी आव्हान दिले आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आता मालेगावला नवी संजीवनी मिळाली आहे. ते मालेगावचे पुढचे आमदार असतील. शिवाय २०२४ मध्ये अद्वय हिरे मंत्री होतील, विकासाला प्राधान्य देणारा मंत्री लाभेल, कमिशनखोर मंत्री नसेल. सिमेंट पासून साखर कारखानापर्यंत कमिशन घेतले, पालकमंत्री म्हणजे मिस्टर ४० परसेंट असल्याचे सांगत दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : 

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवत कायम करून वेतन फरक द्या, बाळासाहेब थोरात

शरद पवारांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version