Tuesday, October 1, 2024

Latest Posts

शिवसैनिकांची कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरून चौकशी सुरु

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात मोठा वाद सुरु आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला मोठ्याप्रमाणत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. शिवसेना नाव आणि चिन्हा साठी हि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. पण आता कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरून चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेचे चौघांचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. या पथकाकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्र खरे आहेत की खोटी याची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशी पथकाने हातकणंगले पोलीस ठाण्यात पाच ते सहा शिवसैनिकांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे शिवसैनिकांसह हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारविरोधात जास्त आंदोलने झाली, त्याच जिल्ह्यांमध्ये कारवाई होत असल्याचा टोला संजय पवार यांनी लगावला. आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई गुन्हे शाखेला आमचे सर्व सहकार्य राहील, असेही संजय पवार म्हणाले. कोल्हापूरमधील १४०० ते १५०० शपथपत्र आम्ही तपासत असल्याचे पथकाने म्हटले आहे. या संदर्भात मुंबईतील निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना पक्ष आपल्याकडे राहावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास ४६०० च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही प्रतित्रापत्रे ठाकरे गटांसाठी तयार केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. नोटरी करणारी व्यक्तीच प्रतिज्ञापत्र भरून देत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

हे ही वाचा:बोगस प्रतिज्ञापत्रावर नाशिक-कोल्हापूरसह चार जिल्ह्यात ठाकरे गटाची मुंबई क्राईम ब्रांचकडून तपास

Double XL Trailer: हुमा आणि सोनाक्षीच्या ‘डबल एक्‍सएल’ चित्रपटामध्ये ‘हा’ खेळाडू साकारणार भूमिका

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाई वाढली, ७.४१ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss