आषाढी च्या महापुजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आले

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. विविध कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

आषाढी च्या महापुजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आले
१० जुलै रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी महापूजेचे आमंत्रण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे. मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन निमंत्रण दिले आहे. पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. विविध कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्याना निमंत्रण दिले. यावेळी विशवस्थ संभाजी शिंदें, ऍड माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुडलवाड हे उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर च्या कामांचे चांगले नियोजन करा. वारकऱ्यांसाठी होणाऱ्या सुविधा परिसरातील विकासाच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूर मंदिराबाहेरील परिसरातील विकासासाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबत सुरु असलेल्या इतर कामाचा सुद्धा यावेळी आढावा घेण्यात आला.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कार केला. वर्षा शासकीय निवास स्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. या वेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
Exit mobile version