आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?, किशोरी पेढणेकरांचे खोचक वक्तव्य

अवघ्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शिंदे गट आणि शिवसेना असा सत्तासंघर्ष बघायला मिळत आहे.

आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?, किशोरी पेढणेकरांचे खोचक वक्तव्य

अवघ्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शिंदे गट आणि शिवसेना असा सत्तासंघर्ष बघायला मिळत आहे. कोणताही राजकीय पक्ष हा एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता भाजप विरुद्ध शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कुरखोडी समोर आल्या आहेत. भाजपाकडूनही आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ‘पेंग्विन सेना’ असा उल्लेख केला तर या त्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या किशोरी पेढणेकर यांनी देखील चांगलाच समाचार घेतला आहे.

 नेमके आशिष शेलार काय म्हणाले होते,

हरित लवादाने पर्यावरणविषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारला तब्बल १२०० कोटींचा दंड केला आहे. यावरून आशिष शेलार यांनी ट्वीट करून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. “हा दंड दोन महिन्यांत भरायचा आहे. मग आता सांग सांग भोलानाथ..हा दंड पालिकेत सत्ता असलेल्यांकडून, अडीच वर्षं पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून, सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?” असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी ट्वीटमधून केला आहे.

आशिष शेलारांच्या या ट्विटमुळे किशोरी पेढणेकरांनी शेलारांचा चांगलाच समाचार घेतला.

हे ही वाचा:

गुजरातच्या आकाराचे डूम्सडे ग्लेशियर आहे आपत्तीच्या काठावर, तज्ज्ञांनी दिला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version