उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिन्ह ठरली…

उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिन्ह ठरली…

उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिन्ह ठरली

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला आणि महाराष्ट्रामध्ये असलेले महविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता दोन्ही गटाकडून खरी शिवसेना कोणती यावरून मोठा वाद दिसून येत आहे. काल निवणूक आयोगाने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलच तापल्याचे दिसून येत आहे. आता सर्वांचं लक्ष शिंदे आणि ठाकरे गट कोणतं नाव आणि चिन्हाची मागणी करणार यावर आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चिन्हाची घोषणा केली आहे.

आजच्या फेसबुक लाईव्ह मार्गात उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीसाठी पक्षाची तीन नावं आणि चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत.

तीन चिन्हं
1. उगवता सूर्य
2. त्रिशूल
3. मशाल

पक्षाची तीन नावं
1. शिवसेना बाळासाहेब ठाकरे
2. शिवसेना प्रबोधनकार ठाकरे
3. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नावाची घोषणा करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संद्याकाळी ६ वाजता जनतेशी संवाद साधला. ४० डोक्याच्या रावणानं प्रभु रामाचं शिवधनुष्य गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं. गोठलेल्या रक्तवाल्याचं इकडे कामच नाही. उलट्या काळजावाल्याचं काम नाही. अशी काही माणसं आणि त्यांची माणसं फिरतात, त्याचा राग येतो. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली. अशी ही उलट्य़ा काळजाची लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं. त्यांना आनंदानं उकळ्या फुटत असतील. पण त्याही मागे त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे. तिला जास्त आनंद होत असेल.बघा आम्ही करुन दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही, ते त्यांचीच माणसं फोडून करुन दाखवलं. कशीही माणसं काय मिळवलं तुम्ही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray Live : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह

शिवसेना संपवण्याचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेंचा वापर – सुषमा अंधारे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version