“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी दौरे सुरु आहेत. प्रत्येक पक्ष हे आपला उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टीने विचार करत आहेत. या निवडणुकीत आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असल्यामुळे प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत.अशातच सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अशातच आज पालकमंत्री दादा भुसे यांनी यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक नवनवीन विषयावर भाष्य केले आहे. जाणून घेऊयात ते नक्की काय म्हणाले ..

पालकमंत्री दादा भुसे काय म्हणाले ?

“काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारपारगिरणा नदी जोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून समानधारक पाऊस होत आहे. गंगापूरसह काही धरणांतून पाण्याचा विसर्ग होत आहे. पूर परिस्थिती बाबत नियंत्रण केले जात आहे. गणेशवाडी परिसरातील ३० कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले आहे. वेळोवेळी पूराबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.”

 त्यात संभाजी नगर मध्ये झालेली घटना ही वेगळी होती तिला वेगळ्या पद्धतीने समोर आणण्यात आले होते. तिथे लाठीचार्ज आणि मारामारी झाली असं सांगितलं जात आहे. पण हे तेवढं मोठं प्रकरण नाही. काल इतका पवित्र कार्यक्रम झाला त्यात तुम्ही प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे. जबाबदारीने वागायला पाहिजे. तुम्ही राजकारणासाठी चांगल्या प्रकल्पात अडथळा आणत आहात. असे वक्तव्य सुद्धा दादा भूसे यांनी केले आहे. प्रधानमंत्री एवढ्या शुभ कार्यक्रमाला येतात, तर त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न केले गेले. हे खूप चुकीचे आहे. राजकारण म्हणून कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असली पाहिजे आणि ही मर्यादा सर्वांनी पाळणे गरजेचे आहे.”

हे ही वाचा:

Sanjay Raut यांच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून MAHAYUTI वर आरोपाच्या थेट फैऱ्या..

“ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय”; Raj Thackeray यांचे भाष्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version