Thursday, July 4, 2024

Latest Posts

“संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत ते झालंच पाहिजे” ; Pankaja Munde यांनी दिली प्रतिक्रिया

"हाके यांचं सालस उपोषण आहे. त्यांची भाषा नम्र आहे. त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून रिस्पेक्ट दिसतो. बाकी कोण काय म्हणतंय त्याकडे पाहण्याची गरज नसल्याचं"

विद्यमान स्थिती व सद्यघडीला अनुसरून सर्वात महत्वाचा मुद्दा चर्चिला जात आहे. एकंदरीत राज्यात एक नवी तेढ निर्माण होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाविरुद्ध ओबीसी आरक्षण हा तो मुद्दा होय. “आमच्या ताटातलं आरक्षण आम्हालाच राहु द्यात, आमचा ताट त्यांना देऊ नका” असे छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) मराठा आरक्षणाविरुद्ध बोलले. त्यावर प्रतिउत्तर म्हणून “आंदोलन करणारे सत्ताधारीच ” असे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले. एकंदरीत मराठा आरक्षणाला कायमच थांबवण्यासाठी कदाचित सरकारनेच ही नवी योजना आखलेली असू शकते.. असो तर या महत्वपूर्ण राजकीय घडामोडीला आता एक महत्वपूर्ण व नवी कलाटणी मिळालेली आहे.

ओबीसी चे आंदोलन तूर्तास काही कालावधीसाठी स्थगित झालेले आहे. याच पार्श्ववभूमीवर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या या निर्णयानंतर त्वरितच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकारपरिषद घेतली आहे. राज्य सरकारकडून शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली होती. या बैठकीला ओबीसी नेते उपस्थित होते. त्यानंतर आज ओबीसी (OBC) आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

पंकजा मुंडे यांनी या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पुढीलप्रमाने – “सरकारने हाकेच्या उपोषणाची दखल घेतली आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळावे म्हणून त्यांनी उपोषण मागे घेतले आसेल, पण त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये ही अपेक्षा. वाघमारे व हाके यांनी ज्या मागण्या दिल्या आहेत त्या मान्य करून लवकरात लवकर लोकांपुढे मांडाव्यात. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र दिलं आहे, असं म्हटलंय. तर ते तपासलं पाहिजे. चुकीचं असेल तर रद्द केलं पाहिजे. नसेल तर तसं सांगितलं पाहिजे. त्यात कुणाला अडचण असण्याचं कारण नाही.”

“हाके यांचं सालस उपोषण आहे. त्यांची भाषा नम्र आहे. त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून रिस्पेक्ट दिसतो. बाकी कोण काय म्हणतंय त्याकडे पाहण्याची गरज नसल्याचं” पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे. “खरं चित्र जे आहे ते प्रचंड दुर्देवी आहे. मी अनेकवेळी म्हटलंय की, ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते. त्यांच्यात भांडण होऊ नये असं मी सांगायचे. मी कोणत्याही मंचावर जाऊन कुणाला काही बोलावं असं मी कधी केलं नाही. आपल्या राज्यात सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे. त्यातून राज्यकर्तेच मार्ग काढू शकतात. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले मुद्दे घेऊन मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले तर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेल” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

“आपण संविधानाच्या आधीन आहोत. कोणताही समाज संविधानाच्या वर नाही. दोन्ही बाजूचे लोकं एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही. संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत ते झालंच पाहिजे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न नाही. एखाद्या समाजाला न्यूनगंड वाटत असेल तर त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा

महाविकास आघाडीशी साधली जवळीक; महायुती ने केली कारवाई !

त्वरा करा विद्यार्थ्यांसाठी ‘अच्छे दिन’; शिक्षणासाठी आणली ‘ही’ नवी शिष्यवृत्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss