Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती पदासाठी शपथबद्ध झाले

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती पदासाठी शपथबद्ध झाले

नवी दिल्ली : एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) चे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आज भारताचे 14 वे (Vice President)उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांनी धनखड यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. जगदीप धनखड यांची 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून केला. आणि जगदीप धनखड हे विजयी ठरत त्यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाली.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे. त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले होते. या खासदारांच मतदान पार पडून हा निकाल जाहीर झाला होता. एनडीएचे (NDA) उमेदवार जगदीप धनकड विजयी झाले होते. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा पराभव केला होता.

हेही वाचा : 

दिल्लीत पुन्हा एकदा मास्क सक्ती तर, राज्यातही कोरोना रुग्णसंखेत वाढ

राष्ट्रपती भवनात जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ बुधवारी संपला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे (NDA) उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला होता. त्यांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा याचा पराभव केला होता.

Jammu Kashmir : राजौरीमध्ये भारतीय लष्कराकडून 2 दहशतवादी ठार, तर 3 जवान शहीद

Exit mobile version