spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र राजकारण: जैन संतांची एकनाथ शिंदेंबद्दल ची भविष्यवाणी ठरली खरी ?

जैन संतांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवत मोठी भविष्यवाणी केली होती

एकनाथ शिंदे यांच्या वागणुकी तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना अक्षरशः ढासळली आहे. याबाबत अनेकजण एकनाथ शिंदेंवर टीका करताना दिसत आहेत. तर काही जण त्यांचं समर्थनही करत आहेत. गेले दोन तीन दिवस एकनाथ शिंदे यांच्यावर चर्चा होताना दिसून येते आहे. यातच त्यांचे काही आमदारांसोबतचे व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होत असून ते चर्चेत आहेत. या सगळ्यात सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि अनेक शिवसेना नेते एका जैन संतांसमोर उभे आहेत. जैन संत समोर उभे असलेल्यांना पाहून एक मोठं सूचक वक्तव्य करत आहेत.
यात जैन संतांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवत मोठी भविष्यवाणी केली होती, अशी प्रतिक्रीया सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या पुढच्या वागणुकीबद्दल सूचक संकेत संतांनी या आधीच दिले होते. पण आदित्य ठाकरे ते संकेत समजू शकले नाही असा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये महाराजांनी सांगितलं की “हिंदूंमध्ये गद्दार आहेत”. तेव्हा एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट ह्यांचा चेहरा पहा कसा झालाय ? महाराजांनी हे विधान करताना बोट एकनाथ शिंदे व संजय शिरसाट यांच्याकडे केले, संतांनी ओळखलं आता महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा ओळखले गद्दार कोण आहेत असे सोशल मीडियावर बोलले जात आहेत.
शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार माझ्या सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक जैन संत शिवसेना नेत्यांना उपदेश देत आहेत. आदित्य ठाकरेही ते लक्षपूर्वक ऐकतायत, एकनाथ शिंदेही हे समोर उभे आहेत. यात संत म्हणतात की, “मुसलमानांमध्ये एवढे गद्दार नाही जेवढे हिंदुंमध्ये गद्दार आहेत.” हिंदुंना धोका हा हिंदुंकडूनच आहे आणखी कुणाकडूनही नाही. अशा हिंदुंना पाकिस्तानात पाठवा.” मात्र असं बोलताना जैन संतांनी थेट एकनाथ शिंदेंकडे बोट केलं आहे,
ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला असा दावा व्हायरल व्हिडिओ शेयर करणाऱ्यांकडून करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र, हे संत नक्की कुणाबाबत बोलले याबद्दल स्पष्टता या व्हिडिओतून होत नाही.

Latest Posts

Don't Miss