spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार ; शेतकरी नेते रविकांत तुपकर

जर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही, तर अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. सोयाबीन-कापसाच्या प्रश्नाबाबत रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात बैठका आणि सभा घेतल्या. त्यानंतर बुलढाण्यात मोर्चा काढला. आता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाले आहे.

हेही वाचा : 

Aaditya Thackeray : राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याने आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

रविकांत तुपकर यांनी प्रसिद्ध वृत्तवाहिनी टीव्ही9 शी बातचित केली यावेळी ते महणाले, ‘ या वर्षी अति पावसाने सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालंय, त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. उत्पादन खर्च भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. एका क्विंटलचा भाव ५ हजार रुपये आहे. बाजारात मिळणारा भाव ५ ते साडेपाच हजार रुपये आहे. हे दर कमी होत आहेत. कापसाचे दर उतरले आहेत. अशा स्थितीत सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. गेले महिनाभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण सरकार दखल घेत नाहीये, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.

रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील ‘राजकीय लढा’ चर्चेत; सहानुभूतीसाठी निवडणुकीच्या प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याचा आरोप

नेमक्या काय आहेत मागण्या

सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ८ हजार ५०० रुपये तसेच कापसाचा भाव प्रती क्विंटल १२ हजार ५०० रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारनं धोरण आखावं. सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन देऊन १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा. खाद्यतेलावर ३० टक्के आयात शुल्क लावा. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा. शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.

काहीही झालेल्यास मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मागे हटणार नाही. पोलिसांनी कितीबही दबाव आला तरी आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही. पोलिसांनी आम्हाला आंदोलन न करण्याची नोटीस दिली आहे. आमचं आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तरीही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली.

Sanjay Raut : साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु…संजय राऊतांचा हल्लाबोल

Latest Posts

Don't Miss